
भुसावळ येथे शालेय क्रीडा स्पर्धां आयोजन नियोजन बैठक संपन्न
भुसावळ येथे शालेय क्रीडा स्पर्धां आयोजन नियोजन बैठक संपन्न
भुसावळ , जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव तथा पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे माळी मंगल कार्यालय येथे 2024 25 मध्ये होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियोजनाची बैठक उत्साह पूर्ण वापरला संपन्न झाली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे होते. तसेच पंचायत समिती भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, तालुका क्रीडा अधिकारी मीनाल थोरात, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रदीप साखरे, एकटा संघटनेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक आर आर धनगर, राजेंद्र कुलकर्णी, रमण भोळे, डी आर धांडे, विलास पाटील, अपर्णा राजपूत हे व्यासपीठावर उपस्थित होते व भुसावळ तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक शिक्षिका या सदर सभेत उपस्थित होत्या. प्रथम गणेश पूजन करून गणेशाच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले. क्रीडा अधिकारी व मान्यवरांचा सत्कार शाल बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप साखरे यांनी केले गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी मार्गदर्शन केले यात शाळानी आपल्या शाळेतील खेळाडू जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यावे. असे सांगितले, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची कामे कोण कोणती असतात हे स्पष्ट करून सांगितले, त्याचबरोबर दहा तालुका स्पर्धा 83 जिल्हा स्पर्धांमध्ये प्रत्येक शाळेने आपले संघ सहभागी करावेत त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती शाळा नाव क्रीडा शिक्षकांना नसते ती सर्व माहिती स्पष्ट करून सखोल स्वरूपात सांगितली त्याचप्रमाणे कुठल्याही शिक्षकाने बोगस खेळाडू खेळू नये असे सुचवले. व आपल्याला कुठलीही अडचण असेल ती सांगा ती अडचण सोडवली जाईल असे अस्वस्थ केले. तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात यांनी ऑनलाईन संदर्भात माहिती सांगितली. व तालुकास्तरीय फुटबॉल, हॉलीबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, कॅरम, क्रिकेट, कुस्ती व मैदानी स्पर्धा या दहा खेळांच्या स्पर्धांचे आयोजन नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघाश्याम शिंदे यांनी केले आभार डॉ. प्रदीप साखरे यांनी मानले.