दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-सौ वसुंधरा लांडगे,आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळगाव विदयालयात व्याख्यान संपन्न
1 min read

दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-सौ वसुंधरा लांडगे,आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळगाव विदयालयात व्याख्यान संपन्न

Loading

दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-सौ वसुंधरा लांडगे

आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळगाव विदयालयात व्याख्यान संपन्न

अमळनेर प्रतिनिधी-जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग अमळगाव ता. अमळनेर जि. जळगाव येथे आज दि. 13 जुलै 2024 ..शनिवारी….मुख्याध्यापक आर. यु. पाटीलसर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. वसुंधरा दशरथ लांडगे मॅडम यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मॅडमांनी अत्यंत प्रेरणादायी असे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरूवात साने गुरुजींची….खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे….. या प्रार्थनेपासून व साने गुरुजींची स्वभाव वैशिष्टे विशद करून केली. आपल्या मार्गदर्शनादरम्यान त्यांनी अनेक महापुरुषांच्या … यशस्वी लोक नेत्यांच्या आठवणी सांगितल्या… त्यांचे महानपण कशात होते, त्यांनी आपापल्या देशासाठी कालसुसंगत कोणते महान कार्य केले यासह त्यांच्या जीवनातील वास्तव आठवणी सांगून विद्यार्थ्यांना त्यांचे महानपण कथन केले. या महापुरुषांच्या कार्यातून बोध घेऊन आपण कशा पध्दतीने यशस्वी होऊ शकतो हे सोदाहरण पटवून दिले. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो हे प्राण्यांची शाळा यातून तर दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे हे फुलांच्या हारातून अत्यंत ह्रदयस्पर्शी पध्दतीने पटवून दिले. यावेळी प्रसंगानुरूप अतिशय गोड आवाजात गाणी गाऊन विद्यार्थ्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. मोठी स्वप्ने पाहा…अत्युच्च यश संपादन करा…मनावर घ्या.. आई – वडीलांसह गुरूजनांचा आदर करा… समाजासाठी जे जे चांगले ते ते अवश्य करा..आनंद घ्या.. आनंद द्या… यासारखा बहुमोल सल्ला मॅडमांनी दिला…
व्याख्यानाच्या शेवटी पर्यावरण संवर्धनासाठी… झाडे नुसती लावू नका तर ती जीवापाड कष्ट घेऊन जगवा… पाणी अडवा… पाणी जिरवा… वसुंधरा वाचवा…. अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात आनंददायी शनिवार या उपक्रमाचे महत्त्व व गरज याविषयी विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब आर. यु. पाटीलसर यांनी आपले विचार मांडले.
इ. 9 वीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने मान्यवर अतिथींचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. संजीव पाटीलसर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *