
रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक प्रकारासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर रेल्वे पोलिसांना धरले धारेवर
रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक प्रकारासाठी
खासदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर रेल्वे पोलिसांना धरले धारेवर
लवकरात लवकर आरोपीची ओळख पटवून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांना तात्काळ अटक करण्याचा सूचना
अमळनेर प्रतिनिधी
भोरटेक ते अमळनेर रेल्वे स्टेशन दरम्यान दि.12 जून रोजी गाडी क्र.09078 रेल्वे चे 4-5 वेळा चैन ओढून रेल्वे थांबविण्यात आली व त्या रेल्वेवर जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचा व्हिडियो सोशल मिडिया द्वारे समोर आला.यासंदर्भात अमळनेर रेल्वे स्टेशन प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे, AEN संजय गुप्ता, कार्य निरीक्षक आडेकरजी, टेलिकॉमनिकेशन इंजिनियर सोनवणे,अमळनेर IPF विकास कुमार नंदुरबार IPF बिजय कुमार,अमळनेर पोलिस निरीक्षक विकास देवरे यांची खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी भेट घेतली व झालेल्या प्रकरणाची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच लवकरात लवकर आरोपीची ओळख पटवून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांना तात्काळ अटक करण्याचा सूचना दिल्या ह्यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष ,
शहरअध्यक्ष, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, भाजपा युवामोर्चाचे पदाधिकारी व
भाजपा,संघ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,पत्रकार उपस्थित होते.