
व्हि .एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद…..
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद…..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
“घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम,ओ सावन राजा कहासे आये तुम……!!! अशा अनेक पावसाळी गाण्यांवर थिरकत व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. अमळनेर येथे दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे “RAINY DAY CELABRATION “करण्यात आला.
पावसाळ्याचा दिवस हा मुलांसाठी नेहमीच मजेशीर असतो आणि जर तो शाळेत साजरा केला गेला तर…..? शिवाय या लहान मुलांसाठी शाळेचे वातावरण हलके व मंत्रमुग्ध करणारे बनते.
पावसाळ्याचा पहिला पाऊस साजरा करण्यासाठी शाळेतील पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पावसाळी दिवस साजरा केला गेला यासाठी संस्थेचे चेअरमन श्री.उत्कर्ष पवार तसेच सचिव सौ.अलका पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी लहान चिमुकल्यांनी रेनकोट,छत्री घालून व कागदाची नाव घेऊन,आपल्या शिक्षकांबरोबर पावसात भिजून धमाल मजा केली.तसेच विविध पावसाळी गाण्यांवर थिरकत विद्यार्थ्यांनी नूर्त्य ही केले. शिक्षकांनी यावेळी या लहान चिमुकल्यांना पावसाळ्यात आढळणाऱ्या विविध गोष्टींची माहिती करून दिली.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले यासाठी त्यांना शाळेच्या प्राचार्या यांचे अनमोल सहकार्य लाभले.
अशा या दिवशी मुलांनी खरोखरच त्यांचे मित्र व शिक्षकांबरोबर उत्सवाचा वेळ घालवला.हा पावसाळी दिवस आनंदाने भरलेला होता.