स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल झाला सत्कार
1 min read

स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल झाला सत्कार

Loading

मनोज पाटील सर यांचा सत्कार सोहळा संपन्न

भिलाली ता.पारोळा – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि. जळगाव येथील संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने सोमगीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा नुकताच पार पडला

मनोज पाटील सर यांनी आज पर्यंत केलेले शैक्षणिक कार्य शिक्षण क्षेत्राबद्दलचा गाढा अभ्यास व नाशिक विभागातील अनेक शिक्षकांच्या सोडविलेल्या अडचणी व प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती ह्या सर्व बाबींच्या अनुभवातूनच मनोज पाटील सरांची या समितीच्या सदस्य पदी निवड झाली

त्यासोबतच सोमगीर शाळेचे उपशिक्षक संजय दावल खैरनार यांचा सेवापुर्ती समारंभ ही पार पडला खैरनार सर हे 24 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोज पाटील सर यांनी स्वीकारले कार्यक्रमाला डॉ. शांताराम पाटील सर,सचिन पाटील सर ,विनोद पाटील सर, विशाल पवार सर, टोळकर सर तसेच पंचक्रोशीतील मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,तसेच भिलाली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक विकास पाटील सर ,प्रास्ताविक विशाल जाधव सर व आभार प्रदर्शन वाल्मीक पाटील सर यांनी केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील, हरेश्वर पाटील , गुणवंत साळुंखे ,रवींद्र मोरे, भाग्यश्री पाटील ,रूपाली पाटील ,आस्तिक पाटील, अरुण पाटील ,रंगराव पाटील, योगेश पाटील ,अविनाश भिल यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *