
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
अमळनेर प्रतिनिधी
शाळेतील परिपाठ संपल्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थी लक्षदीप योगेश पाटील व वेदांत दिनेश पाटील हे शाळेच्या गेट जवळ गेले असता त्यांना लाल रंगाचे एक पॉकेट सापडले. त्यांनी ते पॉकेट आपल्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेगा सोनवणे यांच्याकडे आणून दिले. सोनवणे मॅडम यांनी पॉकेट उघडून पाहिले व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला बाविस्कर मॅडम यांच्याकडे जमा केले. त्या लाल पॉकेटात
दहा हजार रुपये होते. दोघे मुलांनी प्रामाणिकपणे ते पॉकेट जमा केले याचे कौतुक सगळ्यांना वाटले. काही वेळानंतर आकाश पावरा पाकीट शोधण्यासाठी शाळेकडे आले. त्यांनी सदर पॉकेट घरी व शेतात शोधले शाळेत सापडेल या आशेने ते शाळेकडे आले. शाळेत मुलांनी पॉकेट जमा केले तर आकाश पावरा व त्याचे मित्र यांनी समाधान व आनंद व्यक्त केला व दोघी मुलांचे सर्व मुलांच्या समोर योग्य बक्षीस देऊन कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज पाटील व साळुंखे सर, मोरे सर, बागड सर ,मनीषा पाटील ,शिंदे सर ,रूपाली मॅडम व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी लक्षदीप व वेदांत यांचे सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केले.