
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश
10 वी नॅशनल सिलिंग शॉट चॅम्पियनशिप -2024 चे यश
अमळनेर प्रतिनिधी
शिर्डी (महाराष्ट्रा) येथे सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ इंडिया व सिलिंग शॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या संघटनेचे सचिव मा.लवकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्राच्या संघा कडून 25 वर्ष वयोगटा अंतर्गत तुषार दिलीप चव्हाण या खेळाडूने अंतिम फेरीत ब्रांज मेडल (3 रा क्रमांक) व तसेच 19 वर्षातील वयोगटा अतर्गत कुंदन बापु शिरसाठ या खेळाडूने सिल्वर मेडल (2 रा क्रमांक) प्राप्त केले हे दोन्ही खेळाडू जळगाव जिल्हा सिलिंग शॉट असोसिएशन चे खेळाडू आहेत ते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाचे रहिवासी आहेत तसेच तुषार चव्हाण याचे वडील मारवड महाविद्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहे व कुंदन शिरसाठ चे वडील शेतकरी आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे त्यांना जळगाव जिल्ह्याचे सेक्रेटरी श्री सचिन बापूराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व संघटनेचे पदाधिकारी
श्री.चंद्रशेखर देसले व डॉ.देवदत्त पाटील यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.