
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत,
प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा पासून प्रताप महाविद्यालयाने कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थ्यांसाठी फक्त गुरुवारी *नो व्हीहीकल डे* हे धोरण दिनांक १८.०७.२०२४ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
आज निरोगी जीवन जगण्याइतपत परिस्थिती निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे,आरोग्यविषयक अपेक्षा व मागण्या ह्या मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत.या पार्श्वभूमीवर विचार केल्यास आरोग्य हे एक मानव संसाधन आहे म्हणून महाविद्यालयाचे सुद्धा एक धोरण असावे हे लक्षात घेऊन गुरुवार पासून *नो व्हीहीकल डे* राबविण्याचे ठरले.
सायकल चालविणे अथवा पायी चालणे यामुळे आरोग्य संवर्धन व्यवस्था बळकट होते,रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते,हे एक निरोगी एरोबिक व्यायाम आहे त्यामुळे *आरोग्य उत्तम*(better health)राहण्यास मदत मिळते.
*धोरणाचा हेतू* :
————————
१.वायू प्रदुषण कमी करणे
२.शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थ्यांकडून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे
३.सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे
४.अपघात टाळणे
महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात या पूर्वी अशा प्रकारचे धोरण राबविण्यात आले आहे.प्रताप महाविद्यालयाने असे नव धोरण कार्यान्वित केल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम पहावयास मिळेल,या मागे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांची दूर दृष्टी निदर्शनास येते.
गुरुवारी सकाळी ११:१५ वाजता महाविद्यालयाच्या गेट जवळ अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.अरुण जैन,संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,रेक्टर डॉ.अमित पाटील,प्रा.सुनिल पाटील,डॉ.व्ही.बी.मांटे,डॉ.हेमंत पवार,डॉ.सुनिल राजपूत,ग्रंथपाल दिपक पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी दर्शन पाटील,अमोल पाटील,गौरव पाटील,मानसी चौगुले,जयेश पाटील,हिमांशू गोसावी,जानव्ही जोशी,मोहित सूर्यवंशी, जयेश पाटील,जयेश जाधव,दिपक पाटील,वाल्मिक पाटील यांच्या सह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रस्तुत धोरण अमलबजावणी करिता क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल,डॉ.विजय तुंटे, प्रा.हर्षवर्धन जाधव,प्रा.कुबेर कुमावत,डॉ.आर.सी.सरवदे,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.उल्हास मोरे,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.कैलास निळे,डॉ.माधव भुसनर,डॉ.मुकेश भोळे,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकूर, प्रा.बापू संदानशिव,डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.बालाजी कांबळे,प्रा.अवित पाटील,प्रा.जयेश साळवे,कुलसचिव राकेश निळे,कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे,योगेश बोरसे,अजय साटोटे,कमलाकर पाटील,कुंदन निकम,नरेंद्र सातपुते,दुर्योधन नेरकर,मेहूल ठाकरे,पराग पाटील,योगेश चौधरी,दिपक चौगुले यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी सहकार्य केले.