
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंचावर पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत दादा पाटील,संचालिका स्मिताताई पाटील, श्री भूषण दादा चौधरी, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे, बचतगट विभागप्रमुख शुभश्री दप्तरी, संस्थेचे चेअरमन उद्धवदादा पाटील,सदस्य किशोरदादा चौधरी मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. याप्रसंगी हुशार होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले. पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत दादा पाटील यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा ,अभ्यास करा असे सांगितले. तसेच संस्थेचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवदादा पाटील,सदस्य किशोरदादा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पीपल्स बँक नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांचा विचार करून शैक्षणिक साहित्य वाटप करते यासाठी आम्ही पीपल्स बँकेचे आभारी आहोत असे सांगितले. मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मदतीची जाण ठेवली पाहिजे असे सांगितले. प्रज्ञा कापडणे या विद्यार्थिनीनेही पीपल्स बँकेविषयी तिचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली चौधरी यांनी तर आभार भावना चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.