गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार
1 min read

गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार

Loading

गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार

अमळनेर प्रतिनिधी
मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी यांच्या समर्थकांनी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. श्री. प्रविण (बबली) पाठक यांनी मा. आमदार शिरिषदादांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत बोलताना म्हटले की, “काही व्यक्तींना त्यांच्या पात्रतेपेक्षा मोठे पद मिळाल्यावर त्यांच्यात अहंकार येत असतो. सध्या मंत्री महोदय आणि त्यांच्या समर्थकांचा अहंकार वाढला आहे. अमळनेरच्या जनतेत त्यांच्या कार्यप्रणालीबाबत असलेला असंतोष त्यांना आता दिसू लागला आहे. अशात लोकांची कामं करण्याऐवजी दुसऱ्यांवर टीका करण्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी धन्यता मानत आहेत. मा. आमदार शिरीषदादांवर टीका करण्याची पात्रता आपली आहे का हे त्यांनी स्वतः तपासून पहावे. अमळनेरच्या जनतेने मा. शिरीषदादांना कधीही परका समजले नाही. इथल्या गरीब, कष्टकरी जनतेने दादांना या मतदारसंघाचे आमदार बनवले आहे. मागील निवडणुकीतही इथल्या लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मा. शिरीषदादांचंही तेवढंच प्रेम इथल्या लोकांवर आहे. सध्या कोणतंही पद नसतानाही दादांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी येणारा निधी हेच त्याचं प्रतिक आहे.
शिरीषदादांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे या मतदारसंघात मार्गी लावली व आताही त्यांचे अमळनेर शहरात दादांच्या प्रयत्नामुळे सुमारे ३ कोटीचे सौर पथदिवे मंजुर करुन शहरात लावले आहेत. आताही शहरात ५.५० कोटीचे सिमेंट काँक्रिटचे रस्त्यांचे काम चालु आहे. यासाठी दादांनी आपली राजकीय ताकद वापरत राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत चांगल्या राजकीय संबंधांमुळे मतदार संघात निधी खेचुन आणला आहे. सदर कामांचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. अजुनही बरीचशी कामे जिल्ह्याचे नेते मा.ना. श्री. गिरीष भाऊ महाजन साहेब व पालकमंत्री श्री. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून प्रस्तावित आहेत. त्यामुळे आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जर मंत्री महोदय एवढेच सक्षम आहेत तर अधिवेशनात जिल्ह्यातील इतर प्रकल्पांना निधी मिळत असताना पाडळसरे धरणासाठी निधी का आणू शकले नाहीत? तुमचे नेते स्वतःकडे मदत व पुनर्वसन मंत्रालय असूनही मागील वर्षात आपल्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या तालुक्याला दुष्काळग्रस्थ जाहीर करू शकले नाहीत. इथल्या शेतकऱ्यांना पिकविम्याची ७५ टक्के रक्कम मिळू शकली नाही. तुमच्या नेत्याने याचा पाठपुरावा केला का? २०२१ मधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचं काय झालं? मागील वर्षीच्या गारपीटमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची भरपाई काय केली? असे अनेक प्रश्न तुम्ही मार्गी लावू शकले नाही, तर मग तुम्ही नेमके सक्षम कशात आहात? याचं उत्तर संबंधित पदाधिकाऱ्यांनी द्यावं. मुळात लोकांमध्ये याबद्दल प्रचंड चिड आहे. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत इथली जनता लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला देईलच हे ही लक्षात असुद्या.” अशाप्रकारे शिरिष दादा चौधरी मित्रपरिवाराचे नगरपरिषदेचे नेते श्री. प्रविण(बबली) पाठक यांनी भागवत पाटील यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे पहायला मिळाले. आता हे वाकयुद्ध कशाप्रकारे रंगणार, अजित पवार गटाचे पदाधिकारी पाठकांच्या या प्रश्नांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *