
अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय) दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार..
अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा-अँड कौस्तुभ पाटील, (मुंबई उच्च न्यायालय)
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अपयश येऊन देखील हार न मानता, अभ्यासात सातत्य ठेवा, जिद्द, चिकाटी व
आत्मविश्वास जोरावर आपण आपले यश संपादन करू शकतात असे बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले..
ते पुढे म्हणाले की “अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यांच्यापुढे हार मानू नका; त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे.” “आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे; त्याचा सर्वोत्तम वापर करा.” “आत्मविश्वास हा यशाचा पहिला पायरी आहे; त्यावर ठाम राहा.”असे मुंबईतील उच्च न्यायलयाचे सरकारी वकील एडवोकेट कौस्तुभ पाटील यांनी सांगितले.
सविस्तर माहिती अशी कि गेल्या 9 वर्षापासून धरणगाव तालुक्यात श्री समर्थ कृपा क्लासेस सुरू आहे. सालाबाद प्रमाणे इयत्ता 10 वी आणि 12 वी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यात इयत्ता 10 वी मधून कुमारी अस्मिता किरण पाटील, गणित विषयात 99 गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने पास झाली इयत्ता 12 वी मध्ये कुमारी राधिका राजपूत गणित विषयांमध्ये 96 मार्क्स मिळवून धरणगाव तालुक्यात प्रथम क्रमाकाने पास झाले. असे अनेक विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ऍड. कौस्तुभ पाटील, मुंबई उच्च न्यायालय श्री समर्थ कृपा क्लासचे संचालक किरण महाजन सर ,अर्चना राजपूत व इतर पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण महाजन यांनी केले..