शिक्षक हा नव्या पिढीचा आधारस्तंभ असतो-शिक्षक आमदार किशोर दराडे
भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा आणि देश घडविण्याच्या दृष्टीने, नवी पिढी घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून तो आधारस्तंभ असतो त्यांच्या संस्कार क्षमतेतून नवी पिढी घडत असते अशा शिक्षकांना त्यांच्या असणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असून कायमच कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीन असे उद्गार नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांनी समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना व्यक्त केले.त्यांनी याप्रसंगी शिक्षकांनी मतदान करून निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य प्रा. डॉ.अनिल झोपे होते. याप्रसंगी विचारमंचावर माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाट, डॉ.मिलिंद बागुल,तुळशीराम सोनवणे नारायण वाघ,पी.एस.सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आमदार किशोर दराडे यांना डॉक्टर मिलिंद बागुल व भरत शिरसाठ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करून गौरविण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन भैय्यासाहेब सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळे, गणेश बच्छाव यांनी केले. विचार मंचावर गोविंदा पाटील, रावसाहेब जगताप, डॉ. प्रदीप सुरवाडकर, बी एन पाटील, प्रशांत नरवाडे, रणजीत सोनवणे, मनीषा देशमुख, सरिता वासवानी, प्रमोद आठवले,सुधीर महाजन, भैय्यासाहेब सोनवणे, शैलेश शिरसाट, छाया बैसाणे व अनेक मान्यवर उपस्थित होते.