• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जळगांवला “पेन्शन छत्री मोर्चा” ने शासनाचे वेधले लक्ष

Jul 27, 2024

Loading

“पेन्शन छत्री मोर्चा” निव्वळ नतमस्तक…

जळगांव प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जळगावच्या* वतीने शामाप्रसाद मुखर्जी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या मार्गावर *पेन्शन छत्री मोर्च काढण्यात आला*. मोर्चा जिल्हाभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हजर राहिला. महसूल, आरोग्य, शिक्षण, सा बा विभाग, जलसंपदा, जि प कर्मचारी इत्यादी सर्वच विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सोबत जुनी पेन्शन योजनेत असूनही आम्हाला लढण्याचे बळ देण्यासाठी नैतिक पाठिंबा देण्याकरिता उपस्थित सर्व जेष्ठ बंधू भगिनींचेही विशेष आभार. जवळपास दीड दोन किमी रांग निघालेला हा मोर्चा प्रचंड मोठा व अतिशय शिस्तीत निघाला, मोर्च्यावर वरून राजाचीही मोठ्या प्रमाणात कृपा झाली पण तरीही कोणीही डगमगले नाही याबद्दल मोर्चात सहभागी सर्वच NPS धारक बंधू भगिनींचे विशेष कौतुक व आभार.
मित्रहो वेळोवेळी आपण संघटनेला अशीच साथ दिली आहे पुढेही अशीच राहील या अपेक्षेसह आजच्या *पेन्शन छत्री मोर्चाला* सक्रिय पाठिंबा देणाऱ्या जिल्हाभरातील सर्वच विभागाच्या सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांचे हृदयपूर्वक आभार व धन्यवाद.
आजचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी मागील आठ दहा दिवस राबणारी *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जळगावची संपूर्ण जिल्हा कार्यकारणी, राज्य व जिल्हा पदाधिकारी यांचेही विशेष आभार आणि धन्यवाद. आजचा मोर्चा आपल्या मेहनत व नियोजनाशिवाय पार पाडणे अशक्य होत.

डॉ कुणाल पवार सर  जिल्हाध्यक्ष व
जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जळगाव. यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *