डॉ. भुषण चव्हाण (बालरोगतज्ञ) संचालक – विघ्नहर्ता लहान मुलांचे हॉस्पिटल यांची अशीही सामाजिक बांधीलकी..
मुलाच्या वाढदिवसाच्या.निमित्ताने निवासी शाळेत दिव्यांग मुलांना एक महिन्याचा किराणा …
अमळनेर प्रतिनिधी
डॉ. भुषण चव्हाण (बालरोगतज्ञ) संचालक – विघ्नहर्ता लहान मुलांचे हॉस्पिटल, पारोळा सौ.प्रियंका भुषण चव्हाण यांचे चि.शिवांश याच्या वाढदिवसानिमित्त परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना एक महिन्याचा किराणा, फळे,वजन काटा,मदत म्हणून दिली व शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना मोफत औषधींसाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.समवेत सौ.रोशनी जयेश चव्हाण ,चि.ऋषांक होते.डॉ. भुषण चव्हाण यांचा,समवेत परिवार यांचा डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर यांचे वतीने शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच शाळेतील विशेष मुलांनी तयार केलेले भेटकार्ड चि.शिवांशला भेट म्हणून देण्यात आले.सर्व परिवारातर्फे मुलांना फळे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.