यावल : नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात ७ ऑगस्ट रोजी सकारात्मक शपथ पत्र सादर करण्यासाठी मा.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले . . . यावेळी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन दाखल केलेले कमिटीचे पिटीशनर श्री जयंत रमेश चौधरी श्री अशपाक शेख, श्री गणेश गुरव, श्री एस आर पाटील, श्री इमाम शेख, के.जी.चौधरी, सुनंदा सरोदे, सलमा तडवी, एस. एफ. पाटील, पी.सी. तळेले, पी.एस. चौधरी, हर्षद खान, दीपक चौधरी, जितेंद्र चौधरी, जितेंद्र भोंम्बे, अतिश मेघे, प्रशांत राणे, प्रशांत सावळे, उमेश सुरवाडे, कैलास पवार, के. एल. बडगुजर संजय तडवी, गोपाळ पाटील आदींसह 2005 पूर्वी नियुक्त असंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . . . यावेळी शेगाव येथे “बेमुदत आठवण आंदोलन” सुरू आहे तरी सर्व 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के वर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष /पिटीशनर श्री. जयंत चौधरी सर यांनी केले आहे