साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे
शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड
अकोला दि.०३-
सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ,पनवेल (नोंदणीकृत) या संस्थेचा बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवडपत्र प्रदान समारंभ मथुरा लॉन्स, शेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नितीन वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, शाखा बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी अजय माटे, उपाध्यक्ष दीपक सरप
सचिव,विनायक भारंबे, फ़हिम अख्तर संघटन प्रमुख तर सदस्य पदी रतन बगे,अरविंद उन्हाळे,विनायक काळे,
श्रीराम वाघ, किशोर बुजाडे,जयश्री गिते,जावेद शेख,हरिश्चंद्र चिंचोळकर तर अँड.रजनी बावस्कर यांची सल्लागार पदी तर विदर्भ विभाग प्रमुखपदी प्रा. महादेव लुले तर विदर्भ विभाग संघटन प्रमुखपदी विशाल कुलट यांची 31 मार्च 2027 पर्यंत आगामी तीन वर्षांसाठी सर्वानुमते निवड करून निवडपत्र प्रदान करण्यात आली तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज गावंडे यांचे साहित्य अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. ‘शब्दवेल सारख्या साहित्यिक चळवळीतुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास नक्कीच मदत होईल असे विचार आपल्या भाषणातून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ ज्ञानेश्वर मिरगे यांनी मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज गावंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन, ‘साहित्यिक चळवळी ह्या एकमेकांस पूरक असाव्यात असा महत्वाचा विचार अधोरेखित केला. साहित्यिकांनी गटातटाच्या पलीकडे जाऊन निरपेक्ष भावनेने साहित्य सेवा करावी असे आवाहन देखील त्यांनी केले’.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी शब्दवेलचे स्थानिक पातळीवर जास्तीतजास्त राबविण्याचा निश्चय केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक नितीन वरणकार सर, प्रा. संजय कावरे,विनायक भारंबे,विनायक काळे,श्रीराम वाघ, सचिव सौ. अश्विनी अतकरे, सहसचिव रामदास गायधने, खजिनदार देवेंद्र इंगळकर, केंद्रिय प्रसिद्धी प्रमुख विलास पुंडले यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन विशाल कुलट तर आभार प्रदर्शन सचिव विनायक काळे यांनी केले.
===========================