• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Aug 4, 2024

Loading

लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा

ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्ष उद्घाटन सोहळा खासदार व्ही मुरलीधरन संसदीय कार्य राज्यमंत्री राज्यसभा भारत सरकार यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या संगणक पक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..
या कार्यक्रमास चंद्रकांतदादा पाटील उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पालकमंत्री जळगाव पाणीपुरवठा स्वच्छ मंत्री महाराष्ट्र राज्य गुलाबराव पाटील ,ग्राम विकास आणि पंचायत राजमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य अनिल भाईदास पाटील व खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या स्मिताताई उदय वाघ, प्रदेश उपाध्यक्ष भाजप महाराष्ट्र संचालक लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर राजेश जी पांडे यांची उपस्थिती राहणार आहे..
वरील कार्यक्रमाला सर्व शिक्षण प्रेमी बंधू भगिनींनी उपस्थितीत द्यावी असे लोकमान्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रभाकर भावे, प्रा. अरविंद फुलपगारे कार्याध्यक्ष, विवेकानंद भांडारकर चिटणीस, प्रा धर्मसिंह पाटील उपाध्यक्ष, राजेंद्र खांडीलकर कार्याध्यक्ष, राजेंद्र पंढरीनाथ नवसारीकर चेअरमन नवीन मराठी शाळा अंमळनेर, प्रा डॉ प्रभाकर जोशी चेअरमन लोकमान्य विद्यालय अमळनेर, वसंत राजधर पाटील चेअरमन बाल विकास मंदिर अमळनेर, प्रा रमेश रामचंद्र बहुगुणे संचालक गजानन कुलकर्णी संचालक, भालचंद्र मंजुळ सदस्य यांनी केले आहे.. तरी सदर कार्यक्रम 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी अकरा वाजता लोकमान्य शिक्षण मंडळ ज्ञानेश्वर सभागृह अमळनेर येथे आहे.. नंतर साडेअकरा वाजता भोजनाची व्यवस्था केली आहे तरी जास्तीत जास्त शिक्षण प्रेमी व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित द्यावी असे आवाहन केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *