महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन कार्यकारिणीची वार्षिक सभा नाशिक येथे संपन्न
महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनची वार्षिक कार्यकारिणी सभा आज कालिका सभागृह नाशिक येथे नाशिक जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अशोक सावंत यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सभेत ३ री राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धेचे आयोजन ९ ते १० नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले यासाठी सर्व खेळाच्या मैदाने व त्या त्या खेळासाठी पंच व अधिकारी यांची नियुक्ती, साहित्य,स्पर्धेची प्रवेश फी, सहभागी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधा, पदके, प्रावीण्य प्रमाणपत्र, स्पर्धा आयोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक साहेब यांनी शहरातील उपलब्ध मैदाने तसेच उत्कृष्ठ आयोजनासाठी करावयाच्या उपाययोजना, असोसिएशनच्या प्रगतीसाठी फेडरेशन मार्फत करावयाच्या उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले राज्य खजिनदार सुनिल हामंद यांनी स्पर्धा आयोजन खर्चा विषयी माहिती दिली सभेत सांगली व नंदुरबार जिल्ह्यास संलग्निकरण देण्यात आले सभेचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर प्रास्ताविक राज्य सचिव आंतरराष्ट्रीय धावपटू अमन चौधरी यांनी केले सभेस राज्य खजिनदार सुनिल हामंद, पदाधिकारी विजय कुलकर्णी, डॉली तातरे, हेमांगी सावे, वृषाली राऊत, रविंद्र मटकर, PSI भगवान कोळी, प्रशांत कोल्हे, भीमराव शिरसाठ, सचिन महाजन, प्रा.हरीश शेळके, डॉ.मयुर ठाकरे, शशांक वझे, बाबासो दुकाने,प्रशांत आढंगळे, डॉ.गोकुळ काळे, प्रकाश शिरसाठ, दिपक भोसले, चंद्रकांत चाळके यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.