• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी तलावातून काढला मृत देह.

Aug 5, 2024

Loading

नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी तलावातून काढला मृत देह.

सविस्तर बातमी अशी की, नरडाणा पोलीस स्टेशन येथे शिराळे गावाचे पोलीस पाटील तुषार पाटील यांनी माहिती दिली की, शिराळे गावाच्या नजीक असलेल्या तलावात एका इसमाचा मुत देह तरंगत आहे. अशी माहिती मिळाल्या वर डायल 112 वर कार्यरत असलेले पो. ना./54 बी. आय.पाटील व पो.कॉ./ 994 विनोद कोळी हे घटना स्थळी पोहचले सदरचा मृत देह शिराळे गावाच्या नजीक तलावात अवघड अशा ठिकाणी होता तिथे उतरणे ही अवघड होते तलाव साधारणतः 40 फूट खोल होता अशा वेळी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी व शिराळे गावातील विठ्ठल पाटील हे तलावात दोराच्या साहाय्याने उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इसमाचे मृत देह पोलीस पाटील गव्हाणे, पोलीस पाटील शिराळे यांच्या मदतीने बाहेर काढून नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले सदरचा मृत देह हा सतिष साहेब राव पवार वय -44 रा. दत्ताने ता. शिंदखेडा जि. धुळे. असे समजले सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशान्वये – पोलीस हेड कॉन्स्टेबल /पवार करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed