• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !….

Aug 6, 2024

Loading

अखेर आज घंटागाडी फसली !….

कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !….

प्रशासनाने तात्काळ मुरून टाकण्याची व्यवस्था करावी – कृष्ण गीता नगर वासियांची मागणी !….

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ३७५ कृष्ण गीता नगर मध्ये आज अखेर घंटागाडी फसली !… प्रशासनाला अनेकदा रस्त्याची वाईट अवस्था निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील त्यावर मुरूम टाकण्यात आला नसल्यामुळे आज घंटागाडी फसली व नगरपरिषदेचे कर्मचारी सुधीर पचेरवाल ,जितेश पचेरवाल, विशाल पारधी, रत्नाकर सोनवणे, समाधान करंकाळ यांचे खूप हाल झाले.
कृष्ण गीता नगर मधील कॉलनिवासी एकत्र आले यानंतर नगर परिषदेतील दुसऱ्या घंटा गाडीला बोलवुन दोर बांधून दोघं घंटागाडींना टोचन करून नगरवासीयांच्या सहकार्याने घंटागाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली. भविष्यात नगरवासीयांसोबत कुठलीही अशी घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन लवकरात – लवकर मुरूम टाकण्यात यावा ही मागणी नगरवासीयांतर्फे करण्यात येत आहे.
कॉलनीतील शाळेत जाणारे विद्यार्थी, वृद्ध महिला, पुरूष यांना या खड्ड्यांमुळे खूपच त्रास होत आहे. पावसाळा आला की, कॉलनीवासीयांना दरवर्षी खूपच त्रास होतो. नगरपरिषदेचे प्रशासक जनार्दन पवार साहेब यांनी लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी विनंती नगरवासीयांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed