डहाणूत आदिवासी दिनाचे भव्य आयोजन
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
दि. ९ आॕगस्ट २०२४ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू मधील सारणी याठिकाणी आदिवासी नृत्यस्पर्धा आयोजित केली होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस पाटील नाना लक्ष्मण डगला यांनी नारळ फोडून आदिवासी पारंपरिक पद्धतीने केले . यानंतर सारणी गावच्या ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डाॕ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डाॕ. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन स्वागत केले .यानंतर सर्वद फाऊंडेशन संचालिका डाॕ. सुचिता पाटील यांनी आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आदिवासी भाषा, संस्कृतीचे महत्त्व विशद केले .यानंतर वेगवेगळ्या संघांनी तारपा नृत्य , गौरी नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी नाटक सोंग काढणे हेही सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे सूञसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी केले .कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी मंडळीनी परिश्रम घेतले. आदिवासी समाजाची संस्कृती टिकून राहण्यासाठी सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रूपाली राऊत यांनी पत्रकारांना सांगितले .