विधानसभेच्या निवडणुकीत समाजाला प्रतिनिधित्व देणा-या उमेदवाराच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा
राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे
माळी महासंघ मराठवाडा विभागात माळी हक्क परिषद संपन्न:
परभणी मराठवाडा प्रतिनिधी- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील परिस्थिती पाहता माळी समाजातील राजकीय सामाजिक प्रतिनिधित्व अबाधित ठेवण्यासाठी राजकीय चिंतन व हक्क परिषद मराठवाडा परभणी येथे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशभाऊ ठाकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणभाऊ आखाडे साहेब समता परिषदेचे प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष मधुकर झरेकर माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे साहेब विश्वस्थ संतोष जमदाडे साहेब विश्वनाथ थोरे आमचे नेते मा संजय साडेगावकर सेवानिवृत्त उप जिल्हा धिकारी भाऊसाहेब जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शना खाली परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर चिंतन व मार्गदर्शन करताना माळी समाज हा माळी महासंघ समता परिषद सावता परिषद ओबीसी महासंघ महात्मा फुले युवा दल माध्यमातून सामाजिक राजकीय काम करत असून इतर समाजाला बरोबर घेऊन ओबीसी बहुजन इतर समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काही अंश काम ही करत आपले प्रतिनिधित्व सिद्ध राजकीय उद्योग सामाजिक क्षेत्रात करण्याचा प्रयत्न करत आहे आहे माळी समाज हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असून राजकीय प्रतिनिधित्वचा टक्का घसरलेला आहे याचा विचार करता राजकीय क्षेत्रात माळी समाजाचे वर्चस्व मोठा दबाव तंत्रांच्या गट निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी वाढावेत विविध राजकीय पक्षात माळी समाजाचे सहभाग तून ओबीसींचे नवीन नेतृत्व समोर यावे यासाठी या परिषदेच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाकडे माळी समाजातील प्रतिनिधी व उमेदवारी मिळवण्यासाठी माळी हक्क परिषदेच्या माध्यमातून विशेष उपस्थितीत मुद्दे सामाजिक राजकीय परिस्थितीनुसार निर्माण झाले आहे माळी समाजाला विधानसभा 2024 निवडणुकीत ४५ उमेदवार जो राजकीय पक्ष देईल त्या राजकीय, पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा असेल ओबीसी 27% आरक्षण ला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशा प्रकारे ठाम भूमिका आग्रह धरला जाईल साम व दंड भेद राजकीय चाणक्य नीतीचा वापर करत माळी समाजाच्या न्याय व हक्का साठी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद विधान परिषद अशासकीय शासकीय कमिटीवर प्रतिनिधित्व विशेष कार्यकारी अधिकारी प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी एकत्रित संघटनात्मक मायक्रो प्लॅनिंग तरुण नवीन कार्यकर्त्यांचा संच निर्माण करण्याचे नियोजन इच्छुक उमेदवार प्रोत्साहन देऊन अप्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या ताकद उभी केली जाईल असं नियोजन आखणी पाठपुरावा महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यातील तालुक्यात गावात करण्यात येईल यासाठी प्रबोधन व जागृतीसाठी माळी समाजाचे हक्क परिषद राजकीय चिंतन शिबिर आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास याप्रसंगी आज मराठवाडा विभागाच्या वतीने माळी महासंघ आयोजित माळी समाज हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती त्या परिषदे करिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून माळी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव संतोष जमदाडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवनाथ मामा जाधव चंद्रशेखर दरवडे साहेब तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ,राज्य पणन महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय विश्वनाथ थोरे साहेब, रामप्रसाद थोरात साहेब माजी सभापती पस बदनापूर, माळी महासंघ राज्य युवक आघाडीचे अध्यक्ष श्री शरद पेटकर महिला आघाडीचे राज्य उपाध्यक्ष श्रीमती संगीता ताई पवार तसेच महिला आघाडीचे राज्य सरचिटणीस संजीवनी ताई राऊत त्यासोबतच माळी महासंघाचे राज्य सचिव आसारामजी विरकर सहकार आघाडीचे राज्यउपाध्यक्ष दिगंबर जी घाटूळ मराठवाडा विभागाचे महासचिव सिताराम विधाते मराठवाडा विभागीय अभियंता आघाडी दत्ताभाऊ तारो, माळी महासंघ कर्मचारी आघाडी विभागीय अध्यक्ष संतोष जी काळे,छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी रूपालीताई हिवाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक मामा तारो जालना जिल्हाध्यक्ष संतोष रासवे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड नवनियुक्त वैद्यकीय आघाडीचे सुनील जाधव हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ.गोरे साहेब त्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या आहेत मोठ्या संख्येने माळी महासंघाचे पदाधिकारी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष शहराध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी यासोबतच सावता परिषद राज्य प्रवक्ता राजू काळे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष शाम कटारे, माळी महासंघ परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम कटारे,विष्णू थोरात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विविध पदाधिकारी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी तसेच माळी समाजातील विविध आघाड्यांचे विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास माळी हक्क परिषदेस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले माळी हक्क परिषदेचे सूत्रसंचालन सिताराम विधाते यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष जमदाडे यांनी केले