साने गुरुजी शाळेत नूतन इमारतीचे भूमिपूजन
अमळनेर येथील माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव वामनराव पाटील यांच्या स्मृती समारोह निमित्त साने गुरुजी विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर इमारतीचे बांधकाम लोकवर्गणीतून होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंत पाटील, ऍड अशोक बाविस्कर, प्रा एस जे शेख, काकासाहेब देशमुख, भास्करराव बोरसे, किरण पाटील, माजी जि प सदस्य शांताराम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी महेश पाटील, मनोज पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी केले. उद्घाटक बाळासाहेब प्रदीप पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव पाटील व माझे वडील हे चांगले मित्र होते त्यामुळे त्यांच्याशी माझा जवळचा संबंध आलेला आहे. त्याचप्रमाणे बापूसाहेबांची कारकीर्द अत्यंत वाघासारखी गेली त्यामुळे मी त्यांचा फॅन झालो. बापूंचे सातत्याने मला मार्गदर्शन मिळत गेले त्याचा माझ्या राजकीय जीवनात फायदा झाला. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापूर्वी संस्थेने वकृत्व स्पर्धा घेऊन प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना दिले. तसेच बापूंच्या स्मृतीसमारोह निमित्त दोन पुरस्कार सुद्धा दिले. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुरस्कार योग्य व्यक्ती शोधून काढल्या. दुर्गम भागातील पुरोगामी राजकारण्याला व सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला पुरस्कार दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.