
श्रीराम मॅक्रोव्हिजन अकॅडमी सीबीएसई स्कूल येथे नुकतीच जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड
जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड
रावेर: येथील श्रीराम मॅक्रोव्हिजन अकॅडमी सीबीएसई स्कूल येथे नुकतीच जे डी धनके यांची प्राचार्य पदी निवड झाली. त्यांच्या महाविद्यालयीन मित्रांच्या ग्रुपने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यामध्ये शॉल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार मित्रांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून केंद्रीय विद्यालय शिक्षक मिथुन ढिवरे यांनी केले. यामध्ये महाविद्यालयीन ग्रुप सहभागी होता. यात कांतीलाल धनगर सर, राधेश्याम धनगर पोलीस पाटील, प्रदीप सूर्यवंशी सर, नकुल पाटील सर, महाजन उपप्राचार्य सर, संघरत्न दामोदरे, गौतम अटकाळे, मुकेश रावते, राजेंद्र पाटील, धम्मदीप तायडे इत्यादी मित्रांचा सहभाग होता.