ओम गणेश उत्सव मंडळ
अमळनेर पवन चौक जवळील वाणी मंगल कार्यालया समोर यावर्षी ओम गणेश उत्सव मंडळा तर्फे पारथीव श्रीगणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली आहे. श्रींची मुर्ती नाशिकहुन आणली असुन अतिशय सुंदर मूर्ती परीसरातील गणेश भाविक भक्तांच्या श्रध्देचे स्थान ठरली आहे. या मंडळाला खरतर ऐतिहासिक वारसा आहे. सन १९८९ पासून स्व तात्यासाहेब शांताराम तुकाराम ठाकुर (नगरसेवक) यांनी तात्कालीन परीसरातील बांधवांना एकत्र आणून गणेशोत्सव सुरू केला आणि या माध्यमातून परीसरातील स्वछता असेल गावातील समाजिक कार्यात सहभाग, की स्वागत कमान उभारणी असेल याच बरोबर प्रतीवर्षी पौराणिक, धार्मिक, समाज प्रबोधनपर देखावे सादर करुन जनमानसात मंडळाचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
कोरोनाकाळामुळे व तात्यांचे आपल्यातुन अचानक निघून जाण्याने गत ४-५ वर्षा पासून मंडळात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु ह्या वर्षी तात्यांचे सुपुत्र एक्स वॉरंट ऑफीसर ( आर्मी ) श्री चेतन ठाकुर यांनी दुख: बाजुला सारुन तात्यांनी सुरु केलेला हा उत्सव पुढे अविरत सुरु ठेवला. यावर्षी परीसरातील माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. उत्सव काळात नित्य सहस्र आवर्तन त्यांचे मुखे होत असे. त्यामुळे धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जन मिरवणुकीत संत सखाराम महाराज वाडी संस्थान अमळनेर वारकरी पाठ शाळेचे अध्ययनार्थी सहभागी झाले होते ते ही एक वेगळे आकर्षण ठरले.मिरवणुक बॅड व गुलाल विरहित पर्यावरणाचे भान ठेवून काढण्यात आली गणेश उत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन ठाकुर, उपाध्यक्ष श्री विनायक तांबट कोषाध्यक्ष श्री प्रसाद जोशी, सचिव श्री वैभव तांबट, सहसचिव श्री ऋषिकेश जोशी सदस्य श्री दिनकर जाधव, श्री भाऊसाहेब महाजन, श्री सुनील जगताप, श्री हेमंत महाले, श्री अरुण मार्कंडेय, श्री दिपक शिंपी, श्री विशाल तांबट, चि बिटू जाधव, चि नैतिक ठाकुर चि ओम लांडगे यांनी अथक परिश्रम घेतले.