कलासाधना, सामाजिक संस्था, आयोजित राष्ट्रस्तरीय पुरस्कार उत्साहात मोठ्या थाटामाटात संपन्न
कलासाधना सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रस्तरीय पुरस्कार
सोहळा रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी, कराडी समाज हॉल, कामोठे नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे, डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण विभाग कार्यसम्राट शिक्षक आमदार), रेहाना गफूर शेख ( सहाय्यक पोलीस आयुक्त), जयंत सिताराम ओक (सुप्रसिद्ध सिने नाट्य , दुरदर्शन अभिनेता), नितीन चंदनशिवे ( सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश, सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण व दिप्रज्वलनाने झाली. संस्थेचा परिचय श्रीराम महाजन (कोषाध्यक्ष) यांनी करून दिला. यावेळी जीवन गौरव पुरस्कार, गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल, पुस्तक, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्यातून १०५० अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून ५७ पुरस्कारार्थीची निवड करून सन्मानित करण्यात आले.
पुढील पुरस्कार प्राप्त मान्यवरांची त्यांची नावे पुढील प्रमाण
जीवन गौरव पुरस्कार :-
भरत पांडुरंग भोसले, शंकरराव भगवान सा. शहाळे, मनोज रामदास किणी, विनोद तुकाराम भंगाळे, अरूणा प्रभाकर फाटक.
गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार:- शारदा प्रकाश राणा, बाळासाहेब भोरु खाडे, कांचन अनंतराव मुकुंद, राजेश प्रल्हादराव घायल, परशुराम हरिदास घाडगे, सोनवणे संभूराव ओंकार, बीजाक्षी नारायण राय, भरत गणपत म्हात्रे, स्मिता नंदकिशोर शिपुरकर, गजानन भिमराव पाटील, उल्हास बाबाराव देशमुख, संतोष रामहरी साखरे, संतोष दामोदर पेठे, सरिता बाबुराव जयपुरकर, दिनेश सुभद्रा जिभाऊ निकम, बबलू श्रीराम तायडे, गौतम दामोधर पळघामोल, शिल्पा विवेकानंद बन्सोड, वेरोनिका श्रीनिवास अवसरमल, राधिका कुसुरकर, पूनम गजानन गायकवाड, गजानन रमेश गायकवाड, सतीश विक्रम टिळे, गजानन सीताराम शेपाळ, रावसाहेब बंडू रावते, दिपक नवसू शनवारे, वेदांती विनोद पाटील, विनोद अनंत पाटील, लक्ष्मण रामजी राठोड, आनंदकिशोर मेहर, शीतल भागवत जाधव, विना युवानंद मेश्राम, सुदर्शन आजिनाथ फुले, स्वप्नील कैलास जगताप, कलावती सुरेश पहुरकर, नुरी गुलाम मोहम्मद मुस्तफा, नरेंद्र गुलाबराव शिंदे, भास्कर विश्वनाथ देशमुख, विकास नारायण वाघमारे.
राष्ट्रीय गौरव पुरस्कार:-
राहत शायरअली शेख, प्रकाश माळी, सोहेल खान नसीम खान पठान, सुशीला सुनील गांगुर्डे, दत्तात्रय महादेव चिव्हाणे, महेंद्र शंकरराव शिवशरण, दिलीप भिवाजी नारद, प्रेमदास जानकिराम राठोड, चंद्रशेखर धनु जाधव, गीता गणेश मेश्राम, लक्ष्मीकांत धर्मराज कासमगोत्रे, पुष्पलता शरदराव सप्रे, अक्षय अश्विनी अरूण मेस्त्री.
पुरस्कार सोहळा सुत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका अनघा जाधव यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर देवकर (सदस्य) यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होव्यासाठी समाधान रोकडे, जितेंद्र आहिरराव, ज्ञानेश्वर देवकर, शुभम महाजन, मेघा महाजन, श्रीराम महाजन, अरुण पवार, राजीव आवाडे इ. एक महिन्यापासून खूप मेहनत घेतली.