ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयामध्ये पालक शिक्षक संघाच्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ व शिक्षक सत्कार समारंभ के.सी.ई सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाचा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि शिक्षक सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री निरंजन वाणी होते.पालक शिक्षक संघात विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यात सामान्य ज्ञान ,पठण स्पर्धा ,स्वरचित कविता , हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक.मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. याप्रसंगी पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीतील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. शिक्षकांच्या वतीने पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी आर राणे यांनी केले तर तर आभार पालक शिक्षक संघ प्रमुख सौ सुचिता बावस्कर यांनी मानले.सदर कार्यक्रमात पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ई .पी. पाच पांडे ,डी ए पाटील, मनिषा जयकर, सुचिता बाविस्कर, चंदन खरे, यांनी परिश्रम घेतले*