रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन रोटरी इंटरॅक्ट क्लब ची स्थापना
जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गंगाई प्रायमरी इंग्लिश मीडियम व जुनियर कॉलेज करंज येथे आज रोजी “रोटरी इंटरॅक्ट क्लब” ची स्थापना करण्यात आली. क्लबच्या माध्यमातून वैयक्तिक विकास व नेतृत्व कौशल्य भविष्यातील कारकीर्द याबाबत मार्गदर्शन, वेळेचे नियोजन व व्यवस्थापन, संघ बांधणी, पर्यावरण व स्वच्छता आदी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षा Rtn.छाया पाटील मॅडम, Rtn.Adv. किशोर पाटील सर व Rtn.. उज्वला पाटील मॅडम आदि उपस्थित होते.*