• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे-अँड ललिता पाटील, फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन

Oct 1, 2024

Loading

शाळा महाविद्यालयात मुलींना कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात गरजेचे

अँड ललिता पाटील

फिनिक्स ग्रुप अमळनेर तर्फे गर्ल्स प्रोटेक्टिव मिशन चा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी: महिला आईच्या पोटात,घरात,शाळेत,रस्त्यावर समाजात सुरक्षित नाही तर सुरक्षा कुठे मिळेल? दोन वर्षांपासून सखी सावित्री समिती स्थापन झाली मात्र समिती कागदावर राहिली आहे.शाळा महाविद्यालयात कराटे,लाठ्या काठ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात असले पाहिजे असे मुद्दे फिनिक्स ग्रुपच्या ॲड ललिता पाटील यांनी ‛गर्ल्स प्रोटेक्टिव्ह मिशन’ अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात मार्गदर्शन करतांना उपस्थित केले. वसुंधरा लांडगे मॅडम यांनीही प्रबोधन केले यांच्या समवेत डॉ प्रतिभा मराठे, लताताई पाटील व प्राचार्य आशिष शर्मा सर उपस्थित होते
राज्यपाल जळगाव येथे आले असता फिनिक्स ग्रुपतर्फे मुलींना सुरक्षित आणि संरक्षित शिक्षण मिळण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. घरोघरी आचारसंहिता फक्त मुलींना नको तर मुलांनाही हवी.झाशी राणी,माजिजाऊ, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून काहीच होणार नाही त्यांचे गुण व चरित्र आत्मसात करावे लागतील. दुर्गा,महाकाली,रणचण्डिका
बना असे आवाहनही त्यांनी मुलींना केले. समाजात येऊन बोला तुमची मतं चौकात येऊन मांडा. जी स्पष्ट बोलेल तीच वाचेल.
अमळनेर येथील इंदिरा गांधी शाळा,जय योगेश्वर व शांतिनिकेतन शाळा ,जी.एस हायस्कूल,स्वामी विवेकानंद स्कूल,राजश्री शाहू महाराज हायस्कूल,लोकमान्य विद्यालय ॲड ललिता पाटील स्कूल,पी बी ए इंग्लिश स्कूल,प्रताप कॉलेज सीनियर व ज्युनियर,पद्मावती मुंदडा हायस्कूल,न्यू मराठी स्कूल, बोहरा इंग्लिश स्कूल,एम एस डब्ल्यू कॉलेज,गायकवाड हायस्कूल,डी आर कन्या शाळा,सावित्रीबाई फुले स्कूल, भगिनी मंडळ स्कूल येथे मुली व मुलांना मार्गदर्शन केले यावेळी सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले
▪️ठळक मुद्दे ▪️
▪️सखी सावित्री समिती 2022 साली स्थापन झाली व कागदावरच राहिली 2024 बदलापूर प्रकरणानंतर त्यावर काम केले गेले व आज प्रत्येक शाळेत महाविद्यालयात प्रत्यक्षात सखी सावित्री समिती अस्तित्वात आली
▪️महिला आईच्या पोटात शाळेत घरात रस्त्यावर समाजात सुरक्षित नाही तर कुठे सुरक्षा मिळेल.
▪️ निर्भया हत्याकांड्यानंतर पोस्को सारखा येवढा मोठा कायदा करण्यात आला तरीसुद्धा आज अमळनेर असेल जळगाव जिल्हा असेल महाराष्ट्र असेल महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत
▪️ राज्यपाल या महिन्यात जळगाव जिल्ह्यात आले त्यांना फिनिक्स ग्रुप मार्फत सांगण्यात आले we don’t have any more laws for protection and difense
We want defensive and protective Education
मुलींना कराटे लाठीकाठी किंवा इतर संरक्षणाचे एज्युकेशन शाळेमार्फत किंवा महाविद्यालयामार्फत मिळाले पाहिजे त्यांच्या अभ्यासक्रमात हा विषय समायोजित केला पाहिजे
▪️पुरुषांचे पण कर्तव्य आहे आचारसंहिता फक्त मुलींसाठी नव्हे तर मुलांसाठी पण हवी रात्री मुलींनी सातच्या आत घरात राहावे व मुलांनी रात्री बारा एक दोन पर्यंत बाहेर फिरावे हे बरोबर नाही.
▪️ स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे पक्षाला दोन पंख असतात तो दोन पंखांनी आकाशात उडतो उंच भरारी घेतो त्याचा एक पंख जर कापला तर त्याला उडता येणार नाही देशाच्या विकासासाठी मुलगा आणि मुलगी स्त्री व पुरुष या दोघांची गरज आहे तरच देश प्रगती करू शकतो

▪️ तुम्ही दुर्गा बना तुम्ही रण चंडिका बना तुम्ही काली बना ही काळाची गरज आहे
▪️ झाशी राणी माँजिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व पुण्यतिथी फक्त साजरी करून उपयोग नाही त्यांचे जे गुण जिनव चरित्र आहेत ते आत्मसात करावे लागतील
▪️ समाजात स्पष्ट येऊन बोला तुमची मत मांडा चौकामध्ये बोला. तुम्ही शांत रहायला तर तुमच्यावर अत्याचार होणारच बोलाल तर वाचाल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *