महात्मा गांधी म्हणजे युगपुरूष – प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन
———————————————-
● संगणक शास्त्र विभागाचा उपक्रम
● महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यात
साम्य व भेद
● १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा
सहभाग
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत संगणकशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंती निमित्त गांधी विचारधन या वर इतिहास विभागाचे प्रा.विजय साळुंखे यांनी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
प्रा.साळुंखे म्हणाले की,गांधींची प्रासंगिकता आजच्या परिप्रेक्ष्यात खूप महत्वाचे आहे. आज गांधींचे स्वदेशी,अहिंसा,सत्याग्रह, रामराज्य या संकल्पनेचे महत्व आहे. महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्यात साम्य व भेद समजून घेणे आवश्यक आहे.०२ ऑक्टोबर हा दिवस म्हणजे अहिंसा दिन म्हणून सर्वत्र साजरे केले जाते.
या पार्श्वभूमीवर प्रा.साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त होते.
प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पुष्पा पाटील,प्रा.अमित शिंदे, यांच्यासह विभागातील श्वेता पाटील,किरण बोरसे,रुपाली पाटील,प्प्रियंका पाटील, मयुरी पाटील,प्राची पाटील,भाग्यश्री सूर्यवंशी यांच्यासह १५० विद्यार्थी सहभागी होते.