खरीप हंगाम 2023 चे शासनाद्वारे घोषित कापूस व सोयाबीन अनुदान द्या
किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सह शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीनला मिळालेल्या कमी बाजारभावामुळे शासनाने घोषित केलेल्या कापूस सोयाबीन अनुदानापासून हजारो शेतकरी अजूनही वंचित आहेत.. या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावे यासाठी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील सह शेतकरी बांधवांनी उपविभागीय अधिकारी महादेव केळकर यांना निवेदन दिले..
या शेतकऱ्यांनी ऑनलाइन इ-पिक पेरा करण्याचा प्रयत्न केला होता पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नोंद त्यांच्या उताऱ्यावर झाली नाही.. तरी त्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर ती नोंद झाली की नाही व न झालेली असल्यास ती करण्याची जबाबदारी तलाठीची होती ..हजारो शेतकरी या चुकीमुळे लागवड तर केलेली होती पण शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप पिक विमा देखील मिळालेला आहे तर त्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान तलाठी कडून भरपाई करून द्यावे. आधीच शासनाच्या चुकीचे धोरण व नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर अजून एक अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्याल अशी आशा करतो. जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असे किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते प्रा.सुभाष पाटील, बापूराव महाजन, विनायक सोनवणे, विनोद पाटील ,सचिन पाटील ,धनराज पाटील, शांताराम पाटील, पी वाय पाटील, कैलास पाटील, महेश पाटील, योगेश पाटील ,राजेंद्र पाटील सह अनेक शेतकरी उपस्थित होते..