व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याने डॉ. डिगंबर महाले यांचा मुंबईत सत्कार
अमळनेर :
व्हॉईस ऑफ मीडियाच्या नूतन पदाधिकारी, शिर्डी शिलेदारांचा गौरव तसेच संघटनात्मक दृष्टीने आयोजित कार्यशाळेत राज्य सरचिटणीसपदी निवड झाल्याने डॉ. डिगंबर महाले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
मुंबईतील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमात
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजक राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्या म्हणाल्या की, चांगल्या पत्रकारितेमुळे सामाजिक स्तर कायम आहे. हा स्तर अधिक उंचावला जावा यासाठी राज्यातील पत्रकारिता सदैव अग्रेसर आहे, असे त्या म्हणाल्या.
राज्यभरामधल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून निवडणुका होऊन त्यामध्ये निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार, शिर्डी येथे राज्य शिखर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि संघटनात्मक बांधण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विचारपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मंत्रालयातील विधी विभागाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख रामेश्वर नाईक, संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मंगेश चिवटे, रामेश्वर नाईक, यांचीही भाषणे झाली. शिर्डी येथील शिखर अधिवेशन यशस्वी करणारे नगरचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राज्यात निवडणुका घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने मोठा पायंडा पाडला आहे. यात दुसऱ्यांदा विजयी झालेल्या अनिल म्हस्के (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र), योगेंद्र दोरकर (राज्य कार्याध्यक्ष), डिगंबर महाले (राज्य सरचिटणीस), मंगेश खाटीक (राज्य कार्याध्यक्ष, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र विभाग), विजय चोरडिया (राज्य कार्याध्यक्ष मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग), अजित कुंकूलोळ (राज्य उपाध्यक्ष), संजय पडोळे (राज्य उपाध्यक्ष), सतीश रेंगे पाटील (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), किशोर कारंजेकर (विदर्भ विभागीय अध्यक्ष), सचिन मोहिते (पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), मिलिंद टोके (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), अरुण ठोंबरे (मुंबई कोकण विभागीय अध्यक्ष), अमर चोंदे (राज्य कार्यवाहक), रोहित जाधव (प्रदेशाध्यक्ष,व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग महाराष्ट्र), वामन पाठक (प्रदेश सरचिटणीस, व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक महाराष्ट्र), अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद (प्रदेश कार्याध्यक्ष,व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग,महाराष्ट्र) यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यातून सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
… …
फोटो ओळ : व्हॉईस ऑफ मीडियाच्या निवडणुकीत राज्य सरचिटणीस पदी विजयी झालेल्या डॉ. डिगंबर महाले यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजक राजश्री पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, मंत्रालयातील विधी विभागाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख रामेश्वर नाईक. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा.