राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त
विधान भवनात अभिवादन.
मुंबई, दिनांक 2 ऑक्टोबर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज बुधवार, दिनांक 02 ऑक्टोबर, 2024 रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) श्री.जितेंद्र भोळे, सचिव (2) डॉ. विलास आठवले, मा. उप सभापती यांचे खाजगी सचिव श्री.रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.