अमळनेर प्रतिनिधी
आज दि 02/10/2024 वार-बुधवार रोजी चामुण्डा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि.जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सर यांनी प्रतिमांचे पुजन केले.तसेच जाधव सरांनी दोन्ही महात्म्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला.सुत्रसंचलन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.हेमंत महाजन सर यांनी केले.कार्यक्रमाला सर्व कर्मचारी उपस्थित होते.