• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला नारीशक्ती ग्रुपतर्फे रविवारी श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडी, मंगळग्रह सेवा संस्थेचे मार्गदर्शन व प्रायोजकत्व

Oct 3, 2024

Loading

अमळनेरला नारीशक्ती ग्रुपतर्फे रविवारी श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडी

मंगळग्रह सेवा संस्थेचे मार्गदर्शन व प्रायोजकत्व

अमळनेर : येथील नारीशक्ती ग्रुपतर्फे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४ रोजी पहाटे ४.४५ वाजता श्रीक्षेत्र सतीमाता पायीदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था दिंडीचे प्रायोजक व मार्गदर्शक असून, स्पार्क फाउंडेशनचे यासाठी सहकार्य लाभले आहे.
शहरातील पी. एन. ज्वेलर्स, तिरंगा चौक, कुंटे रोड दगडी दरवाजा, पैलाड मार्गे श्रीक्षेत्र सतीमाता मंदिरापर्यंत जाणाऱ्या या दिंडीत सुमारे ५०० वर महिलांचा सहभाग असेल. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींनी शक्यतोवर लाल किंवा पिवळी साडी परिधान करावी. दिंडी सतीमाता मंदिर येथे पोहोचल्यानंतर सहभागी महिलांसाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे उपवासाच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासासाठी आयोजकांतर्फे चारचाकी वाहनांची व्यवस्था केली जाईल. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा निशा दुसाने, उपाध्यक्षा माधुरी पाटील, सदस्या योगीता पांडे, नेहा देशपांडे आणि विद्या शहा तसेच मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *