• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कल्याण पश्चिम विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी, ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)कल्याण पश्चिम विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी

Oct 21, 2024

Loading

कल्याण पश्चिम विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी,

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)कल्याण पश्चिम विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी

 

ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण (कुणाल म्हात्रे)

कल्याण पश्चिम विधानसभेत आतापर्यंत मनसेचे प्रकाश भोईर, भाजपाचे नरेंद्र पवार विद्यमान शिंदे गट शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे आमदार निवडून आले आहेत.

कल्याण पश्चिम विधान सभा क्षेत्रात केडीएमसीचे उंबर्डे पासून टिटवाळा गणपती मंदीर परिसरापर्यंत ३८ प्रभाग तसेच कल्याण तालुक्यातील ग्रामीण मधील नांदप गाव अशी भौगोलिक रचना असून यामध्ये उंबर्डे, सापार्डे, बारावे, टावरीपाडा, गौरीपाडा, भोईवाडा, रेतीबंदर, शहाड, वडवली, आंबिवली, मोहने, गाळेगाव, बल्याणी, मोहली, उबर्णी, मांडा, टिटवाळा आदी गावांसह विकसित झालेला रहिवासी परिसराचा समावेश होत आहे. रौनक सिटी, गोदरेज हिल, खडकपाडा, फ्लावर व्हाली, भोईर वाडी, चिकण घर, योगीधाम, दुधनाका, पारनाका, टिळक चौक, रामबाग, जोशीबाग, सर्वोदय गार्डन, रहेजा काँम्पलेक्स असा विकसनशील, अविकसित चाळीवजा स्लम् परिसर मोडत आहे.
यंदाच्या विधानसभेसाठी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यानुसार आजमितीस मतदारांची संख्या 4 लाख 34 हजार 928 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदार 2 लाख 28 हजार 788 व स्त्री मतदार 2 लाख 6 हजार 125 व इतर मतदार 15 इतके आहेत.
हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक मयूर पाटील, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपाकडून माजी आमदार नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी या मतदार संघावर दावा केला आहे. तर महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे विजय (बंड्या) साळवी, सचिन बासरे, दयाशंकर शेट्टी, साईनाथ तारे, कॉंग्रेसकडून कांचन कुलकर्णी, राकेश मुथा, राजाभाऊ पातकर, मनसेकडून माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक उल्हास भोईर, कस्तुरी देसाई यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

या विधानसभा क्षेत्रात आँक्टोबर २०१५ मधील कल्याण डोंबिवली मनपा निवडणूकित पक्षीय बलाबल पहाता ३८ प्रभागापैकी, शिवसेना २०, भाजपा ७ मनसेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २, एमआयएमचे २ अपक्ष३ नगरसेवक अशी स्थिती ती कल्याण पश्चिमेतील ३८ प्रभागातील होती. आघाडी बरोबर असलेल्या शिवसेनच्या एकनाथ शिंदे यांनी उठाव करून राज्यात शिंदे सरकार भाजपाबरोबर युती करून आणले आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यामध्ये उबाठा गटात हाताच्या बोटावर मोजता येणारे नगरसेवक राहिले. तर इतरांनी शिंदेगट शिवसेनेला समर्थन दिले.
असे असताना शिवसेना शिंदे गटाचा वरचष्मा दिसत असला तरी उबाठा गटाचे निष्ठावंत शिव सैनिकांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाळ्या मामांना जिंकून आणण्यासाठी महत्वाची भूमिका दाखवली असल्याने सद्यस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची कल्याण पश्चिमेची उमेदवारी कोणाला मिळते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रस्थापित नगरसेवकांच्या वार्डात ते मताधिक्यासाठी कसे कार्यरत राहतात, हे निवडणूक निकालानंतर समारे येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *