• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रिफायनरीला विरोध कायमच! उध्दव ठाकरे.

Oct 22, 2024

Loading

रिफायनरीला विरोध कायमच!
उध्दव ठाकरे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली .
यावेळी बारसू येथील सालेगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे पक्षाकडून रिफायनरी विरोधी भूमिकेच्या ठामपणाबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पुर्वी झालेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला.
मा.उद्धव साहेबांनी रिफायनरी विरोधात पक्षाची भूमिका आजही ठामच असल्याचे व पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधाचा मुद्दा घेणार असल्याचे सांगितले.पाहिजे तर माझ्यासोबत फोटो काढून बॅनरवर माझे वचन छापा’ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर , सचिव व माजी खासदार विनायकजी राऊत , आमदार राजनजी साळवी , राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड तसेच संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर , सरचिटणीस नरेंद्र जोशी , आदेश भोवड , सूर्यकांत सोडये , विनायक शिंदे , संतोष तिरलोटकर , स्वप्नील सोगम , गोपीनाथ घाडी , तुळशीदास नवाळे , महेंद्र गुरव , अमित नेवरेकर , मार्गदर्शक सत्यजीत चव्हाण आणि नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई , पाळेकर वाडी(नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम व माडबनचे राकेश वाघधरे उपस्थित होते.

आमदार राजन साळवी यांना पूर्वी केलेल्या रिफायनरी समर्थनाबद्दल जाब विचारण्यात आला. आमदार राजन साळवी यांनी माझी यापुढे रिफायनरी विरोधी भूमिका कायम राहील व पक्षाने जरी भूमिका बदलली तरी मी रिफायनरी विरोधी भूमिका शेवटपर्यंत बदलणार नाही , असे वचन दिले.

संघटनेमार्फत पक्षाची भूमिका सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यात येईल असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *