*विधानसभा निवडणुकीत आर एस पी युनिटचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.*
*ठाणे जिल्ह्यात आर एस पी शिक्षक युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे,विधानसभा निवडणूक 2024 अधिकारी कर्मचारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय अशोक शिंगारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभळे मॅडम,निवासी जिल्हाधिकारी संदीप माने साहेब, मल्लीकार्जून माने साहेब,सर्जेराव मस्के साहेब, रोहित राजपूत, उपजिल्हाधिकारी वैशाली माने मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे,विधानसभा निवडणूक 2024 अधिकारी कर्मचारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा निवडणूक काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडणुका अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नोडल ऑफिसर, संगणक सहाय्यक, ईव्हीएम टेक्निकल ऑफिसर, स्ट्रॉंग रूम मॅनेजमेंट, मनुष्यबळ पुरवठा अधिकारी, वाहतूक नियोजन अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ठाणे आरएसपी अधिकारी युनिटने विधानसभा निवडणुकीत आर एस पी चे नाशिक पालघर नाशिक विभागीय युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी व विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय अशोक शिनगारे साहेब यांच्या आदेशानुसार निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून यशस्वीरित्या कर्तव्य चोखपणे पार पाडले सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी जिल्हा निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले त्याबद्दल विभागीय आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय श्री.अशोक शिनगारे साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून उत्कृष्ठ कर्तव्य करणारे भिवंडी,शहापूर आर एस पी समादेशक श्री.मंगेश भामरे,ठाणे शहर समादेशक श्री. सुनिल पाटील, श्री.बाळासाहेब साठे,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे, उपसमादेशक श्री.विनोद शेलकर,कळवा मुंब्रा समादेशक श्री.संजय खैरनार,शहापूर तालुका समादेशक शी.गोपाळ दिक्षित, उल्हासनगर समादेशक श्री.संतोष गोरडे,अंबरनाथ बदलापूर समादेशक श्री.दत्तात्रय पाटील, आर एस पी अधिकारी श्री.दत्तात्रय पटवर्धन,श्री.शरद बोरसे,श्री.दिगंबर जोगमार्गे,पवार सर, सुमित तांबडे, ठाकूर सर,दिवाकर वाघ, श्री.योगेश अहिरे, श्री.सतीश पाटील, श्री.करणसिंग जडेजा,यांच्यासह सर्व निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून कर्तव्य करणाऱ्या आर एस पी अधिकारी शिक्षकांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय श्री.अशोक शिनगारे साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगारे साहेब यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक यांचे कार्य व जिद्द खूप मोठी आहे प्रत्येक मतदान केंद्रावर या आर एस पी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून कर्तव्य करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती दिली व त्यामुळेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाणी देण्यापासून वयोवृद्ध अपंग मतदारांना मदत करण्याचे व मतदारांना रांगेत उभं करून योग्य बूथवर मतदान करण्यासाठी सहकार्य केले. व कोणत्याही मतदान केंद्रावरून मतदारांची एकही तक्रार आली नाही इतके सुंदर व नियोजनबद्ध काम आरएसपी अधिकारी यांनी स्वयंसेवक कडून करून घेतले त्याबद्दल आर एस पी अधिकारी युनिटचे मनापासून धन्यवाद व्यक्त करत आगामी काळात आर एस पी अधिकारी यांचे सहकार्य प्रत्येक वेळी कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चा सहकार्यामुळे ३६८८ एनएसएस, एनसीसी , स्काऊट गाईड, व आर एस पी चे छात्र सैनिक स्वयंसेवक म्हणून उपलब्ध झाले, व सर्वांनी अतिशय उत्कृष्टरित्या प्रत्येक मतदान केंद्रावर अपंग व्यक्ती,ज्येष्ठ नागरिक,यांना हात धरून मदत करणे,मतदारांना रांगेत पाणी देणे, बूथ क्रमांक सांगणे, अशी कौतकास्पद कामगिरी बजावली .तसेच सर्व आर एस पी, एन एस एस, एनसीसी व स्काऊट गाईडचे छात्र सैनिक यांनी स्वयंसेवक म्हणून कर्तव्यावर घेऊन निवडणूक प्रक्रिये बाबत प्रॅक्टिकली माहिती मिळाली. व स्वयंसेवक छात्र सैनिकांनी देखील अतिशय उत्कृष्टरित्या दिलेली जबाबदारी पार पाडली. त्याबद्दल सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासह निवडणूक अधिकारी व झोनल अधिकारी यांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले होते. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रत्येक स्वयंसेवक यांना देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सन्मानपत्र देऊन कौतुक म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ला निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून कर्तव्य करण्याची संधी, व योग्य मार्गदर्शन व विशेष सहकार्य तहसीलदार प्रदीप कुडाळ साहेब यांच्याकडून मिळाले.तसेच महसूल सहायक श्री.मनोज फर्डे सर यांनीही संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ला मोलाचे सहकार्य केले.यावेळी आर एस पी चे प्रसिद्धीप्रमुख डॉ. किशोर बळीराम पाटील, आर एस पी चे नागरी संरक्षण विभाग प्रमुख डॉ. किशोर अढळकर, व ठाणे जिल्हा मार्गदर्शक समाजसेवक श्री. माणिक पाटील उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूरचे अध्यक्ष श्री. संजय शेंडे साहेब, उपाध्यक्ष पी. एस. महाजन सर, सचिव श्री. श्याम फाळके सर, प्रशिक्षण प्रमुख श्री पोहरे सर, राज्य कायदेविषयक सल्लागार अँड. डॉ. श्री.के.डी.पाटील साहेब, चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे, डॉ.यशवंत म्हात्रे,समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले, समाजकल्याण न्यासाचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील, शिक्षक संघाचे गोकुळ पाटील सर,ठाणे आर एस पी मार्गदर्शक डॉ राज परब सर यांच्याकडून संपूर्ण आरएसपी युनिटचे अभिनंदन करण्यात येत आहे.