महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !…
खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक )
मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख )
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तीन जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी ३ दिवस क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
प्रस्ताविक क्रीडाशिक्षक एच डी माळी यांनी केले तद्नंतर हॉकीचे जादूगर हॉलीबॉलपटू मेजर ध्यानचंद व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दि.२६,२७ व २८ डिसेंबर,२०२४ रोजी शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, लिंबू – चमचा, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, संगीत खुर्ची, लांब उडी, दोरी उडी, गोणपाट, १०० मीटर रनिंग, स्लो साइकल, बुद्धिबळ, १ मिनट अशा स्पर्धांचा समावेश होता. मुला – मुलींनी तीन दिवस क्रीडा महोत्सवाचा खूप खूप मनसोक्त आनंद घेतला.
तिसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेता टीमला व विजेत्या खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले येत्या ३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जन्मोत्सवाचा औचित्य साधत मुलांना बक्षीस वितरण होणार आहे असे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी स्पष्ट केले व खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते असे प्रतिपादन केले. क्रीडा शिक्षक एचडी माळी यांनी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते व खेळाविषयी विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू – भगिनी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.