• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बाल हक्क संरक्षणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षण* , *ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प प्रतिनीधी साठी राज्य स्तरीय विशेष प्रशिक्षण*

Dec 29, 2024

Loading

*बाल हक्क संरक्षणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षण*

*ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प प्रतिनीधी साठी राज्य स्तरीय विशेष प्रशिक्षण*

*वाल्मी, छ. संभाजी नगर*

ऍक्सेस टू जस्टिस प्रकल्प अंतर्गत बाल हक्क संरक्षणासाठी स्वयंसेवी संस्था प्रतिनीधी साठी दोन दिवसीय प्रशिक्षण वाल्मी , छ. संभाजी नगर येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणात बाल विवाह मुक्त भारत, बाल लैंगिक शोषण, बाल दुर्व्यापार, तस्करी यासारख्या विषयावर गंभीरपने चर्चा झाली.
साधन व्यक्ती म्हणुन दिल्ली येथून राजीव भारद्वाज, माधवी घोडके, म.झाकीर यानी प्रशिक्षण सत्र घेतले . मास्टर ट्रेनर संगीता व अभय अवस्ती यांनी बाल संरक्षणासाठी प्रभावी धोरणे व कायद्याचा वापर यावर भर दिला.

समाजामध्ये बालक संरक्षण बाबत जागरूकता निर्माण करणे आणि कार्यरत संस्थांची क्षमता बांधणी करणे यावर या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये जोर देणेत आला . बाल संरक्षणासाठी सर्व जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

*प्रशिक्षण सत्रामध्ये आधार संस्था जळगाव जिल्हा प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, सुनिल हिवाळे* यांचेसह महाराष्ट्रातील संस्था प्रतिनीधी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *