ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांना भारतरत्न अटल बिहारी राष्ट्रीय गौरव पुरस्कार2024प्रदान
उरुळी कांचन पुणे:
एकता फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ कवी, भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने देण्यात येणारा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2024, येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. एकता फाउंडेशन एम एस एम इ उद्यम मंत्रालय, निती आयोग भारत सरकार, आय एस ओ प्रमाणित सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके नागपूर यांनी हा पुरस्कार प्रदान केला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे ह्यांनी नैसर्गिक आपत्ती ,मराठवाडा भूकंप वैद्यकीय ,सामाजिक धार्मिक वैद्यकीय अध्यात्मिक कोरोना पेंडेमिक, व्यसनमुक्ती ,वृक्षारोपण संस्थात्मक कार्य ,कुपोषण मोहीम, बाल आरोग्य मोहीम, कुष्ठरोग दुरीकरण मोहीम ,पल्स पोलिओ मोहीम,राष्ट्रीय सेवा योजने मध्ये कार्यक्रम, एन वाय के क्रीडा युवक क्रिडा युवा मंत्रालयाच्या वतीने विविध उपक्रम समर्पित भावनेने राबविलेले आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे निष्काम कर्मयोगी, शांती सेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्तोत्रअसून जनतेच्या भल्यासाठी निरंतर कार्य करणारा कर्मयोगी आहेत.प्रवचनाद्वारे प्रबोधन करून व्यसनमुक्तीचे कार्यही केलेले आहेत. डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या समर्पित ,निरपेक्ष निरंतर सेवाव्रती कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट , डिस्ट्रिक्ट असे 480 पुरस्कार मिळालेले आहेत. ते क्षमा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली, एस एस आय एफ संस्था जयपूर येथील संस्थांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. उरुळी कांचन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत. पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत राज्यभर अनेक सामजिक , अपंग संस्थांमध्ये ते समर्पित भावनेने कार्य करित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई यांनी डॉ. रवींद्र भोळे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केलेले आहे. डॉक्टर रवींद्र गोळे यांचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झालेले आहे.मराठवाडा भूकंपातील कार्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालकस्व .बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्या कार्याचें कौतुक केले होते. डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या जीवनावर पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले यांनी ‘वाळवंटातील समाजसेवी सरोवर डॉ रवींद्र भोळे ‘ असे चरित्रात्मक पुस्तक लिहिलेले असून त्या पुस्तकाचे प्रकाशन स्वर्गीय शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांचे हस्ते झालेले आहे. पुणे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान डॉ रवींद्र भोळे यांना मिळालेला असून भारताचें भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे या वारकरी संस्थेचे ते पदाधिकारी वैद्यकीय प्रमुख आहेत. अशा अनेक राज्यस्तरीय संस्थांमध्ये राष्ट्रीय संस्थांमध्ये ते कार्य करीत आहेत.