• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रताप’ मध्ये विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग* ———————————

Jan 1, 2025

Loading

*प्रताप’ मध्ये विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग*
——————————————–
● वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त स्पर्धा
परीक्षेत २४६ विद्यार्थ्यांचा सहभाग
● सीसीएमसी विभागाचा उपक्रम
● मुख्य परीक्षा,पीपीटी सादरीकरण,
गट चर्चा,मुलाखतद्वारे स्कॉलर
प्रतापियन्स निवड होणार
————————————————-
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करियर कौन्सिल सेंटर मध्ये प्रताप कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त स्कॉलर प्रताप्रियन्स निवडीसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा,पीपीटी सादरीकरण, गटचर्चा, मुलाखत या विविध टप्प्याद्वारे पाच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया पारदर्शक असून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे.
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त करियर कौन्सिलिंग सेंटर प्रत्येक वर्षी बेस्ट स्कॉलर प्रताप्रियन्स यांची निवड करीत असते यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या धरतीवर विविध स्वरूपाच्या टप्प्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकास चाचणी व कौशल्य तपासले जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड परीक्षकांच्या माध्यमातून केली जाते.
प्रस्तुत स्कॉलर प्रतापियन्स निवडीसाठी डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवींद्र माळी, प्रा.प्रशांत ठाकूर यांच्या समवेत स्कॉलर प्रतापियन्स निवड समितीतील सर्व सन्माननीय सदस्य हे गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करीत असतात.
दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी या निवडीचा पहिला भाग म्हणजे पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची 100 गुणांची सकाळी ११:३० ते ०१ पर्यंत सीसीएमसी विभागात व ऑडिओ,व्हिडिओ हॉल या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी २४६ विद्यार्थ्यांनी MPSC च्या धरतीवर असणारी ही परीक्षा दिली. त्यांची मुख्य परीक्षा ही ०४ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. ०६ जानेवारी रोजी ज्वलंत विषयावर गटचर्चा व पीपीटीचे सादरीकरण होणार आहे, त्यानंतर ०७ तारखेला टॉप १५ गुणवंत विद्यार्थी असतील, त्यांची मुलाखत प्रक्रिया ही प्राध्यापक डॉ. एस.ओ.माळी,डॉ. शशिकांत सोनवणे, डॉ.तुषार रजाळे,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.प्रशांत ठाकूर,प्रा.विजय साळुंखे ,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.बापू संदानशिव,डॉ.किरण भागवत हे घेणार आहेत.
एकूण 15 गुणवंत विद्यार्थ्यातून शेवटी गुणांनूकर्मे पाच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे ,त्यांना स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथीद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
आज झालेल्या पूर्व परीक्षेच्या नियोजनासाठी स्पर्धा संजोजक डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.प्रशांत ठाकूर,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर, ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.जयेश साळवे,प्रा.अनिल झळके,डॉ.बालाजी कांबळे,प्रा.विजय साळुंखे, प्रा.प्रतिभा पाटील,श्री दिलीप शिरसाठ, श्री पराग पाटील, विशाल अहिरे, प्रा.अमोल अहिरे,अतुल राजपूत,प्रा.हिमांशू गोसावी यांनी विशेष सहकार्य केले.
प्रस्तुत स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.ए.बी जैन,डॉ.धीरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,डॉ.मुकेश भोळे आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *