• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न..

Jan 31, 2025

Loading

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न..

अमळनेर प्रतिनिधी-येथिल सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक-30 जानेवारी रोजी इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ .गायत्री भदाणे या होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी प्रा.सुनील डी .पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुरेश पाटील, प्रा.सुनील साळुंखे, प्रा. आर.आर.पाटील, गोपाल हाडपे ,अनिल पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा.कल्याण नेरकर, प्रा. नितीन पाटील, नितीन खंडारे, दीपककुमार पाटील, समाधान पाटील, नीलिमा पाटील, रूपाली पाटील , हर्षल बेहरे उपस्थित होते. यावेळी इ.10 वी ची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी पाटील, प्रियंका पाटील, कृष्णा सोनवणे, रोशनी कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. इ. 12 वी च्या विद्यार्थिनी मधून तनुजा पाटील , स्नेहा पाटील, गायत्री पाटील, पायल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सुरेश पाटील यांनी केले. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेकडून सुरुची भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका वृंद, अविनाश बाविस्कर, संदीप पवार, सुरेश पाटील, संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *