फिलीपाईन्समधील वैद्यकीय अभ्यासक्रमात अकोल्याच्या अतुल देशमुख चे नेत्रदिपक यश
अकोला– अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्रीधरराव देशमुख, नायगावकर (स्वातंत्र्य संग्राम सैनिक) , यांचा नातू अतुल शरदराव देशमुख हा फिलिपाईन्स या देशातून AMA lnstitute of Medical Studies (एम बी बी एस )ला प्रथम दहा मध्ये उत्तीर्ण झाला असून त्याने भारतातील F M G C Delhi ही परीक्षा सुद्धा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.एका भारतीय विद्यार्थ्याने वैद्यकिय अभ्यासक्रमात प्रदेशात प्राप्त केलेले उच्चांकाचे यश हा देशासोबतच समाजाचा आणि विशेषत: देशमुख समाजाही गौरव आहे.त्याबद्दल डॉ.अतुल शरदराव देशमुख याचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदन होत आहे .