• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पत्रकारांमुळे माहिती होऊन समाजात जागृती होते- महादेवराव भुईभार* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४२ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *प्रा‌.राजाभाऊ देशमुख,भुईभार यांना लोकस्वातंत्र्य जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार.‌!* *अमरावतीकरांना कार्ड,नियुक्तीपत्रे वितरण तथा सहयोगी स्वयंसेवकांचे प्रोत्साहनात्मक सन्मान*

Mar 1, 2025

Loading

*पत्रकारांमुळे माहिती होऊन समाजात जागृती होते- महादेवराव भुईभार*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४२ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न*

*प्रा‌.राजाभाऊ देशमुख,भुईभार यांना लोकस्वातंत्र्य जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार.‌!*

*अमरावतीकरांना कार्ड,नियुक्तीपत्रे वितरण तथा सहयोगी स्वयंसेवकांचे प्रोत्साहनात्मक सन्मान*

*अकोला* – पत्रकार हे समाजाचा सेवक असून त्यांच्या वरृतमान परिस्थितीची माहिती होऊन समाजात आवश्यक ती जागृती होते. शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे आणि त्यांनी स्वत:ची प्रगतीकडे लक्ष म्हणून पेरण्यांची वेळ साधण्यासाठी पंढरपूरात आषाढीला न जाता कार्तिकेत जावे,दिवाळीत मुर्तीपुजेऐवजी घरातील गृहलक्ष्मीचेच पुजन करावे.असे वास्तव प्रतिपादन समाजप्रबोधक,कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४२ व्या विचार मंथन मेळाव्यात ते अध्यक्षिय भाषणातून बोलत होते.परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी समाजसेवक आणि पत्रकारांनी संघटीत होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद,अत्याचारग्रस्त भगिनी,कुंभमेळ्यातील बळी,दिवंगत पत्रकार,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्ती व अपघातातील बळींना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रा‌.राजाभाऊ देशमुख व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुरेश तिडके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी महादेवराव भुईभार तथा प्रा.राजाभाऊ देशमुख यांना लोकस्वातंत्र्य सामाजिक जीवन गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने तर उल्लेखनिय प्रशासकीय आणि सामाजिक सेवेबध्दल सुरेश तिडके यांना स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात आले. पत्रकार महासंघाची मोतीबिंदू शिबीरे व सामाजिक उपक्रमात नेहमी सहयोग देणाऱ्या निंबा येथील गणेश देशमुख,अमोल देशमुख,दिपक मास्कर,विनायक आंबुसकर,रामदास हिवसे,वासुदेव बावणे अशा २२ स्वयंसेवकांना प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अमरावती जिल्हा आणि चांदुरबाजार व अचलपूर तालूक्यातील पदाधिकाऱ्यांची संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व अमरावती जिल्हाध्यक्ष संजय देशमुख( गावंडगांवकर) व अतिथींच्या उपस्थितीत आय कार्ड व नियुक्तीपत्रे देऊन स्वागतं करण्यात आली.यावेळी लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.संजय देशमुख यांनी प्रस्ताविकातून प्रशानातील अनागोंदी,भ्रष्टाचार,आणि आणि संविधानिक प्रतारणेचा समाचार घेऊन जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात सिव्हील लाईन पोलिस स्टेशनने कसूर करून सौ सोनल अग्रवाल यांचेवर केलेल्या अन्यायाची माहिती देऊन हे प्रकरण आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली.अशा प्रकाराविरूध्द पत्रकार आणि समाजसेवकांनी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले.
प्रा.महादेव लूले उर्फ देवबाबू यांच्या उत्कृष्ट संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रा.डॉ संतोष हुशे,अॕड राजेश जाधव,सिध्देश्वर देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,माणिकराव कांबळे,के‌.व्ही.देशमुख,अंबादास तल्हार,संदिप देशमुख,अमरावती जिल्हाध्यक्ष संजय भा‌.देशमुख,अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम, सामाजिक सेवा संघ अध्यक्ष संजय देशमुख,कंझारेकर, मनोहर मोहोड, दिलीप नवले,विजय सु.देशमुख,रमेश समुद्रे, वसंतराव देशमुख,सी‌.ए.तुषार तल्हार सौ.प्रतिक्षा तल्हार,धारेराव देशमुख,शामराव देशमुख,गौरव देशमुख,उल्हास मोकळकर, डॉ ‌अशोक सिरसाट,अशोककुमार पंड्या,फुलचंद वानखडे,अनंतराव देशमुख, अर्जूनराव घुगे,के‌.एम‌.देशमुख,योगेश सिरसाट,रविन्द्र देशमुख,शिवचरण डोंगरे, दिपक सिरसाट,अनंत महल्ले,प्रशांत देशमुख,सतिश देशमुख (विश्वप्रभात) ,प्रा.सुरेश मोरे,देवराव सिरसाट,गजानन मुऱ्हे,गजानन चव्हाण,संतोषकुमार गवई,संघपाल सिरसाट,सौ‌.सोनल अग्रवाल,शांताराम धोत्रे,रविन्द्र देशमुख,पांडूरंग आगळे,पि‌.एन. जामोदे,अमरावतीहून किशोर वानखडे,उमेश वानखडे,गजानन कावरे,गणेश थोटांगे ,गजानन ढवळे,शंकरराव मानापूरे,सुनिल तळोकार,संजय सरवटकर,नानासाहेब धुळे (अमरावती) दिलीपराव देशमुख,गणेश देशमुख,दिपक मास्कर,अमोल देशमुख,वासुदेव बावणे,विनायक आंबुसकर,रामदास हिवसे (निंबा) व ईतर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.आभारप्रदर्शन राजेन्द्रजी देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed