*समाजसेवक डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित*
कासोदा ता .एरंडोल ( प्रतिनिधी )
येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी यांना ‘ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ‘ नासिक येथील सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत नुकताच नासिक पंचवटी येथील स्वामी नारायण मंदिर हॉलमध्ये पद्मश्री परशुराम खुणे व सिने अभिनेत्री अंजली आकळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.मुल्लाजी यांचा हा शतकोत्तरी १०३ वा पुरस्कार आहे.
हिंदू मुस्लिम समाजात नेहमी विधायक कार्यक्रमान्वये धर्मनिरपेक्ष एकता प्रस्थापित करण्यासाठी मुल्लाजी नेहमी प्रयत्नरतअसतात.
अपंग संघटनाच्या माध्यमातून दिव्यांगाना शासकिय योजनांचा लाभ मिळवून देणे , ग्राम व तालुकास्तरीय आरोग्य शिबिर घेणे , रक्षाबंधन , ईद मिलन सणांन्वये दोन्ही समाजात बंधूभाव निर्माण करणे , महापुरुषांचे जयंती साजऱ्या करून त्यांचे महन्मंगल विचार समाजापर्यंत पोहोचवणे , शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींचा वयोवृद्ध तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजू लोकांना लाभ मिळवून देणे. त्याचप्रमाणे कासोदा गावाची कब्रस्तानची सुरक्षा भिंत खासदार निधीतून मिळवणे , प्राथमिक उर्दू शाळेस वाढीव खोल्या मंजूर करून आणणे,उर्दू प्राथमिक शाळेचे विभाजन करून उर्दू प्राथमिक मुलांची व मुलींची शाळा नंबर १ व नंबर २ असे विभाजन शिक्षणाधिकाऱ्यांकडून मंजूर करणे , विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वाढीव शिक्षकांची मागणी मान्य करून शैक्षणिक गुणवत्ता सर्वतोपरी वाढविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. कासोदा स्वग्रामी मौलाना आझाद जयंती, ईद-ए-मिलादुन्नबी ( पैगंबर जयंती ) , मोहरम निमित्त सिबील कार्यक्रम, शांतता प्रस्थापित करून धार्मिक ऐकोप्याचा पायंडा घालून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.डॉ.नुरुद्दीन मुल्लाजी यांनी निःस्वार्थीपणे केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्य तसेच पत्रकारितेतून समाजोन्नतीचे उल्लेखनीय व अजोड कार्य केल्याबद्दल त्यांना ‘ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त झाल्या प्रित्यर्थ कासोदा सरपंच पुरुषोत्तम भास्कर चौधरी,माजी सरपंच महेश पांडे , माजी सरपंच अब्दुल अजीज अब्दुल बारी ,जळगावचे माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार ,जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले ,भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे , द्वारकाई प्रतिष्ठान अध्यक्ष सुनिल दाभाडे सर ,पत्रकार बंधू राजकीय व सहकार क्षेत्रातील मित्र परिवार व आप्तेष्टांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.