महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेमार्फत NPS/UPS चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद.
*विकल्प निवडण्यासाठी तीन ते सहा महिन्याची मुदत मिळावी:: कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी.*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींना
राज्यशासन NPS ( सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना),
केंद्रशासन UPS एकीकृत निवृत्ती वेतन योजना)
च्या संदर्भात एक संभ्रम निर्माण झालेला होता की कोणता विकल्प आपण निवडावा त्याचे निराकरण करण्यासाठी त्याची सखोल माहिती असलेले मा श्री.शरदजी मोराणकर सेवानिवृत्त लेखा अधिकारी प्रशिक्षण तथा तज्ञ मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मा. शरदजी मोराणकर यांनी त्यांच्या दीड/ दोन तासाच्या व्याख्यानामध्ये शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे /शंकांचे निरसन केलं आलेले शिक्षक हे प्रत्येक प्रश्नाचे व शंकांचे निरसन करून गेल्याचे समाधान संघटनेला मिळाले तसेच
कोकण विभाग शिक्षक आमदार
श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर हे अधिवेशन चालू असल्याने उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व शिक्षकांची संवाद साधला तसेच विकल्प निवडण्यासाठी तीन ते सहा महिन्याची मुदत मिळावी यासाठी संघटनेने शासनाकडे पत्र व्यवहार केलेला असल्याचे म्हात्रे सर यांनी सांगितले
कार्यक्रमास
श्रीमती ललिता दहितुले मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग ठाणे
मा.श्री.दिलीपजी घनगाव
लेखाअधिकारी तथा अधीक्षक वेतन पथक जिल्हा परिषद ठाणे
ज्येष्ठ शिक्षक नथुलाल भामरे तसेच
इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका वैशाली पाटील संचालक सुनील पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमास ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर मीरा-भाईंदर नवी मुंबई मधून 300 ते 400 शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री.प्रशांत भामरे, वसंत जोहरे, अनंत किनगे, अनिल पाटील,विलास जाधव,अर्जुन उगलमोगले, बाळकृष्ण जगे,समाधान काळे, प्रकाश चव्हाण,संजय भामरे, मगर सर,मडके सर, दुसाने सर, बन्सीलाल महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनंत किंनगे यांनी केले
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटने मार्फत शिक्षकांचा एक जिव्हाळ्याच्या विषया संदर्भात मार्गदर्शन शिबिर लावल्यामुळे सर्व शिक्षकांमार्फत प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवर व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे व शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग प्रमुख प्रशांत भामरे व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे श्री.विनोद शेलकर यांनी आभार व्यक्त केले.