*प्रताप महाविद्यालयात एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन*
अमळनेर प्रतिनिधी: येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय NAAC कार्यशाळेचे आयोजन 22 मार्च 2025 रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात आले आहे.
प्रस्तुत कार्यशाळेत NEP 2020 And UGC Compliant Binary Accreditation : Paradigm Shift in Quality या विषयावर मा.पियुष पहाडे (अध्यक्ष,IQAC CLUSTER) हे मार्गदर्शन करतील.
प्रस्तुत कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, IQAC समन्वयक,कार्यालयीन अधिक्षक, प्राध्यापक उपस्थित राहू शकतात.सदरच्या कार्यशाळेसाठी रुपये 350 नोंदणी शुल्क आहे.
प्रस्तुत कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त जणांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन प्राचार्य डॉ.अरुण जैन,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे आणि आयोजन समितीतील सदस्यांनी केले आहे.