वारकरी साहित्य परिषद नेहमी वारकऱ्यांच्या पाठीशी-
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल काका पाटील
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र 13 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शिर्डी येथे दोन दिवस दिनांक शनिवार व रविवार दिनांक 22 व23मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातीलअनेक कॅबिनेट तसेच पालकमंत्र्यांनी संमेलनाला भेट देऊन वारकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी वारकऱ्यांच्या प्रश्न समस्या तसेच शासनाकडून मिळणारी मदत याबाबत संपूर्ण सहकार्य आपणास मिळेल संमेलनात महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील वारकरी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ह भ प दिलीप महाराज शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी यांनी महाराष्ट्र राज्याचे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या प्रश्न समस्या तसेच नियमित वृद्ध कलावंतांचे मानधन तसेच नवीन वृद्ध कलावंतांचे मानधन सुरू करण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यात नवीन कमिटी स्थापन करून वृद्ध कलावंतांचे मानधनांचे प्रस्ताव मंजूर करण्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रशासना तर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा अशी मागणी यावेळी पदाधिकारी यांनी राज्य अध्यक्ष विठ्ठल काका पाटील यांच्याकडे महिला व पदाधिकारी शिष्टमंडळाने भेटी प्रसंगी मांडली यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पवार कार्याध्यक्ष दिलीप महाराज तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी विठोबा माळी महिला जिल्हाध्यक्ष रत्नाबाई खैरनार यावेळी संमेलनासाठी धुळे जिल्ह्यातील 140 वारकरी संमेलनात सहभागी झाले होते