“दीपक-करुणा: हुंडा विरोधी चळवळीचे यशस्वी पुनर्मिलन, अमळनेर महिला समितीचा महत्त्वपूर्ण मध्यस्थी रोल!”
अमळनेर प्रतिनिधी
हुंडा घेणार नाही अशी शपथ घेऊन चळवळीत काम करणारा अति उत्साही कार्यकर्ता दीपक याचा नुकताच विवाह झाला होता.. पण लग्ना नंतर काही महिन्यातच त्याला समजले की त्याचे घरच्यांनी पत्नी करुणा च्या कुटुंबाकडून गुपचूप हुंडा घेतला आहे. हे माहीत असून माझी पत्नी मला सांगत नाही, याचा अर्थ ती भविष्यात माझेही किती खोटे लपवून ठेवेल? असा आरोप करीत दिपकने करुणाला माहेरी पाठवून दिले.
4 महिने संघर्ष सुरू असताना दोघांचा हेतू चांगला असल्याचे पटवून देत अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने समेट घडवून आणला. या निमित्ताने अति उत्साही व कठोर तत्व निष्ठ नवऱ्याचे अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीने कान फुंकले.
तत्व पाळायलाच हवेत पण इतके कर्मठ असू नये हा सल्ला देत दीपकच्या धोरणाचे कौतुक करतानाच करुणाची चूक काय? तिला तुझे सोबत राहायचे होते म्हणून तिने सत्य कथन केले नाही हे सांगत अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीने दीपक ची समजूत काढून त्याचे डोक्यातील अति तत्त्व निष्ठा व कर्मठ पणा बद्दल प्रबोधन केल्याने अमळनेर येथील करुणा व जळगाव येथील दीपक पुन्हा एकत्र आले.
चूक मान्य करून पुन्हा दोघे संसारात रममाण झाल्याने महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, निशा विसपुते, मंगला विसपुते, बाळकृष्ण शिंदे व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
महिला अन्याय विरोधी समितीने अशा अनेक प्रकरणात समुपदेशन करून संसार उभारण्यात मदत केल्या बद्दल मंगळ मंदिराचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले, डॉ जी एम पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, साने गुरुजी वाचनालय अध्यक्ष दिलीप सोनवणे, गौतम मोरे, प्रा. शिला पाटील, मनोहरनाना पाटील राजकुमार कोराणी, आदींनी कौतुक केले.